मायनिंग विरोधात आंदोलन

March 31, 2010 10:27 AM0 commentsViews: 5

31 मार्चसिंधुदुर्ग जिल्ह्यातील्या रेडी इथे मायनिंग प्रदुषणाच्या विरोधात आज जनआंदोलन होत आहे.रेडी मायनिंगमधील खनिज उघड्या डंपर्समधून गोव्याला नेले जाते. हे डंपर्स मुख्य रस्त्याने न जाता गावातून जातात. त्यामुळे रेडीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि अपघात होत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ लागला आहे. शिवाय गेली 40 वर्षे रेडीत मायनिंग व्यवसाय सुरू असूनही या गावात पायाभूत सुविधा झालेल्या नाहीत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या सगळ्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

close