निसर्गाचा चमत्कार असाच हा ‘इंद्रवज्र’

June 11, 2016 9:28 PM0 commentsViews:

उदय जाधव, 11 जून : निसर्गाची अनेक रुपं आपण नेहमीच पहात असतो…असाच एक निसर्ग चमत्कार ‘इंद्रवज्र’ च्या रुपात कोकणकड्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला पहायला मिळतो. ‘इंद्रवज्र’ म्हणजे संपूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य… ‘इंद्रवज्र’ जेंव्हा दिसते त्यावेळी या वर्तुळाकार इंद्रधनुष्यात आपलं प्रतीबिंब सावलीच्या स्वरुपात दिसते. त्यामुळेच ‘इंद्रवज्र’ पहाण्याचं कुतूहल निर्माण होतं.

हरीच्छंद्र गडावर पोहचणारी अवघड वाट पुढे कोकणकड्यावर जाते. याच कोकणकड्यावरून ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचा परीसर दिसतो. इंद्रवज्र दिसण्यासाठी आवश्यक असणारे पावसाळी ढग कोकणकड्याच्या अंतर्वक्र भागात आल्यानंतर ते वरच्या दिशेला वक्राकार फिरत वेगाने सरकतात. आणि त्याचवेळेस सरळ रेषेतील सुर्य प्रकाश त्या ढगांवर पडल्यास, या मार्गात एखादी व्यक्ती उभी राfहली असता ‘इंद्रवज्र’ निर्माण होते.indravarja

सरळ रेषेतील सुर्य प्रकाशाच्या मार्गात, एखादी व्यक्ती अडथळा निर्माण करून उभी राहिल्यास, त्याच्या पडणार्‍या सावली भोवतीच हे ‘इंद्रवज्र’ निर्माण होते. हे सर्व एक नैसर्गिक विज्ञान आहे.

कोकणकड्यावर हे ‘इंद्रवज्र’ सर्व प्रथम ब्रिटीश लष्कारातील कर्नल साईक्स याने 1835 साली बघितलं. या घटनेची नोंद त्याने गॅझिटीयरमध्ये करुन ठेवली होती. या घटनेचा शोध रानवाटा या गिरीभ्रमण संस्थेने 2008 साली कोकणकड्यावर येऊन घेतला.

रानवाटा संस्थेतील तरुण गिर्यारोहकांनी फक्तं ‘ंइंद्रवज्र’ आपल्या समोर आणलं नाही. तर एक जागरुक नागरिक म्हणून हरीच्छंद्र गड आणि कोकणकड्याची स्वच्छता आणि पर्यटन कसं इकोफ्रेंन्डली राहील यासाठी दरवर्षी काम करत राहिली. गडावरील पुष्कर्णी तलावातील गाळ गावकर्‍यांसोबत स्वता: हातात फावडे आणि घमेले घेऊन काढला. गडावरील प्राचीन मंदिरं दरवर्षी येऊन स्वच्छं ठेवली. खरंतर ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारने अशा दुर्गम आणि ऐतिहासिक वास्तूंकडे किती लक्ष दिलंय हे जगजाहीर आहे. म्हणून कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वता:हून रानवाटा संस्था निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचं काम करतेय. हे सर्वासाठी डोळ्यात अंजन घालणारी कामगिरी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा