मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी वरुण गांधींच्या समर्थकांची बॅनरबाजी

June 12, 2016 4:02 PM0 commentsViews:

varun-gandhi_650x400_61465702409

12 जून :  अलाहाबादच्या जवळपास सर्व गल्ल्या बॅनर, पोस्टरने सजल्या आहेत, ज्यांच्यावर शहरात मोदी तसंच इतर नेत्यांचे स्वागत करण्यात आलं आहे. पण सुलतानपुरचे भाजप खासदार वरुण गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचं उमेदवार करावं या मागणीसाठी, त्याच्या समर्थकांनी मोठय़ा संख्येत अलाहाबादमध्ये ‘मिशन 265 प्लस’ असं बॅनर, पोस्टर्स लावले आहेत. 403 आमदारांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अमित शाह यांनी उत्साह भरला आहे.

मिशन 265 प्लस लिहलेल्या या पोस्टर वरुन भाजप नेतृत्त्वावर दबाव आणण्याचा वरुण गांधी समर्थकांचा प्रयत्न आहे. पण भाजप सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेतृत्त्व या पोस्टरबाजीवर नाराज आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावं याचा निर्णय भाजप लवकरच अंतर्गत सर्वकरुन करणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपला अजूनही चेहरा सापडलेला नाही, मुलायम आणि मायावतींना शह देण्यासाठी एका भक्कम नेत्याची गरज आहे. पण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारीसाठी साफ नाही म्हटलं आहे. प्रचार प्रमुख बनण्याचीही त्यांची इच्छा नाहीये. तसं त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला कळवलं आहे. याचं कारण म्हणजे राजनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशच्या राजकारणात शिरायचं नाही आहे. त्यांना पुढेही केंद्राच्या राजकारणातच रस आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशची निवडणूक भाजप कुणाच्या नावावर लढवणार, हे पहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा