भारताच्या ‘फुलराणी’नं पटकावले ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचं जेतेपद

June 12, 2016 6:35 PM0 commentsViews:

sainaweekly

12 जून :  भारताची फुलराणी सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजचं विजेतेपद मिळवलं आहे. सिडनीत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनानं हा विक्रम आपल्या नावावर केला. सायनाने चीनच्या सून यूचा 11-21, 21-14, 21-19 असा पराभव केला.

ऑस्ट्रेलियन ओपन 2016 सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात सायना नेहवालनं पहिला सेट 11-21 असा गमावला. मात्र, नंतर सायनाने दणक्यात पुनरागमन करत दुसरा सेट 21-14 ने जिंकला तर शेवटच्या गेमध्ये दोघींनीही तोडीचा खेळ केला. अखेर सायनाने 21-19 असा विजय मिळवत जेदेपदावर नाव कोरलं आहे.

रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजमधला सायनाचा हा विजय भारतीय चाहत्यांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा