सातार्‍यात वृक्षारोपणाचं महाअभियान, सयाजी शिंदे करणार आईची बीजतुला

June 12, 2016 1:01 PM0 commentsViews:

मंगेश चिवटे, सातारा

12 जून :  पावसाची कायम वक्रदृष्टी असलेल्या आणि दुष्काळचा सामना करावा लागणार्‍या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात काल एका अभिनव प्रयोगाची सुरुवात झाली.

सातारा जिल्ह्यातलं दिवडी गाव अभिनेता सयाजी शिंदेनं जलसंधारणाच्या कामासाठी दत्तक घेतलं आहे. याच गावात वृक्षारोपण महाअभियानाला सुरुवात झाली. आपल्या आईची बिजतुला करून सयाजी शिंदेनं बीजारोपण केलं आणि तब्बल 8 हजार झाडं लावण्याचा संकल्प सोडला.

êËÖêËêÖêy

सह्याद्री, देवराई या अभिनव मॉडेलची अतिशय उत्साहात सुरुवात झाली. यातल्या 4-डी विलेज म्हणेजच दिवडी- कोलवाडी- पांढरवाडी- गोडसेवाडी या चारही गावांच्या मध्यभागी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्यात आलं.

राज्य सरकार दोन कोटी वृक्ष लागवडीचं अभियान राबवणार आहे, त्याचा ब्रँड अम्बेसिडर सयाजी शिंदेला करावं अशी मागणी माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली. तर ते काम करण्याची तयारी सयाजीनंही दर्शवली.

एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला वृक्षारोपण चळवळीसाठी सयाजी शिंदेनं एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तहानलेल्या मराठवाड्यात जर अशाच देवराईसारख्या प्रयोगांची सुरुवात झाली तर दुष्काळ निर्मुलनाला मदत होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा