…तर सेना सत्तेत कशी?, तरूण भारतमधून शिवसेनेवर टीका

June 12, 2016 8:17 PM0 commentsViews:

Uddhav and Fadnavis

12 जून :  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजपला टार्गेट केले जात असतांना संघाची विचारधारा असणारं वृत्तपत्र तरुण भारतने आजच्या संपादकीय मध्ये शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकार हे निजामाचे बाप असल्याची टीका शिवसेनेने केली होती. यावर तरुण भारतच्या आजच्या संपादकीयमध्ये भाजपचं सरकार निजाम असेल तर सेना सत्तेत कशी?, ज्यांनी दलित वस्त्यांवर हल्ले केले?, कसलेही आंदोलनं पुकारुन हफ्ते स्विकारले त्यांना रझाकार म्हणायचं का?, असा खोचक प्रश्न या लेखातून सेनेला विचारला आहे.

‘बावचळलेल्या शिवसेनेचा तोल सुटलाय’ अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्तंभलेखक दिलीप धारुरकर यांच्या लेखात संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारची तुलना निजाम सरकारशी केली होती. तेव्हापासून या वादाला तोंड फुटलं आहे.

निजामाच्या सरकारमध्ये अनंत गीते, रामदास कदम, दिवाकर रावते सुभाष देसाई हे कोण आहेत? निझामाच्या सरकारमधील सलारजंग कि कासीम राझवी लोकसभेच्या निवडणुकीत एकतर्फी सेना भाजप युतीचा विजय झाला याला कारण मोदी लाट होती हे लक्षात न घेता सेनेनं आपला बेडूक फुगवला असल्यांचेही या संपादकीय लेखात लिहलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा