चेन्नई सुपर भिडणार रॉयल चॅलेंजर्सशी

March 31, 2010 10:37 AM0 commentsViews: 2

31 मार्चआयपीएलमध्ये आज धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला असणार आहे तो अनिल कुंबळेच्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सशी.7 मॅचपैकी तब्बल 5 पराभव पत्करावा लागलेली चेन्नईची टीम पॉईंटेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी यापुढची प्रत्येक मॅच चेन्नईसाठी महत्वाची ठरणार आहे. कॅप्टन धोणीसह, हेडन, पार्थिव पटेल, सुरेश रैना आणि ऍब्ली मॉर्केल असे भक्कम बॅट्समन या टीममध्ये आहेत. पण तरीही विजयी कामगिरी करण्यात ते अपयशी ठरत आहेत. याऊलट बंगलोरच्या टीममध्ये मोठी नावे नसली तरी सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम विजयी कामगिरी करतआहे. 6 मॅचपैकी बंगलोरने 4 मॅचमध्ये विजय मिळवले आहेत. जॅक कॅलिस ऑलराऊंड कामगिरी करत टीमसाठी मॅचविनर ठरत आहे. तर त्याला रॉबिन उत्थप्पा, मनिष पांडे यांची चांगली साथ मिळत आहे.

close