गोव्याचे मंत्री बाबूश मॉन्सेरात अडचणीत

October 13, 2008 2:19 PM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर, गोवागोव्याचे शिक्षणमंत्री बाबूश मॉन्सेरॉत हे आता नव्या वादात अडकले आहेत. मॉन्सेरॉत यांच्या मुलानं एका परदेशी अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिच्या आईनं केलाय. तसंच राजकीय दबावामुळं पोलिस तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तिची तक्रार आहे.बाबूश मॉन्सेरॉत यांचा मुलगा रोहित यानं आपल्या 14 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप गोव्यात जर्मन संशोधक महिलेनं केलाय तसंच त्यानं तिला अश्लील एसएमएस पाठवल्याचंही तिनं म्हटलंय. 2 ऑक्टोबरला तिनं याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं सांगितलं आहे पण, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

close