सेव्हिंग अकाऊंटवर रोज मिळणार व्याज

March 31, 2010 10:41 AM0 commentsViews: 4

31 मार्च सर्व पगारदारांसाठी एक खूष खबर आहे. 1 एप्रिलपासून त्यांच्या सेव्हिंग अकाऊंटवर दरदिवसा व्याज आकारले जाईल.त्यामुळे बचत खात्यात आता घवघवीत व्याज मिळणार आहे. सध्या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपासून ते महिना अखेरीपर्यंतच्या रकमेवर साडे तीन टक्के व्याजदर आकारला जातो. पण आता दरदिवशीच्या मुद्दलावर हा व्याजदर आकारला जाईल. त्यामुळे ठेवीदारांचा मोठा फायदा होणार आहे.

close