सेल्फीचा बळी, दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

June 13, 2016 9:28 AM0 commentsViews:

मुरुड- 13 जून : मुरुडमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. शनिवार-रविवारची सुट्टी पाहून अभिजीत पवार हा तरुण आपल्या 4 मित्रांबरोबर मुरुड जंजिर्‍याला गेला होता. वाटेतच डोंगरी इथं दरीजवळच्या दगडावर तो सेल्फी काढण्यासाठी गेला होता. पण सेल्फी काढताना त्याचा अचानक पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला.

murud3सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ इथं रहाणारे पाच मित्र मुरुड जंजिरा फिरावयास आले होते. आज ते राजपुरी किल्ला पाहण्यास जात असताना वाटेतच डोंगरी येथे एका नयन रम्य ठिकाणी जंजिरा किल्ला याचे विलोभनीय दृश्य काढण्याचा मोह या पर्यटकांना झाला. त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली गाडी थांबवून एका ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी अभिजित प्रकाश पवार हा एका दगडावर उभे राहून स्वता:चा सेल्फी काढण्यासाठी उभा राहिला पंरतु नुकताच पाऊस झाल्याने दगडे निसरडे झाले होते. याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून तो खडकाळ भागात जाऊन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मित्रांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले पंरतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या या अकाली मुत्यूमुळे कुटुंबावर मित्र परीवावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा