1984 शीख दंगली प्रकरणी 75 खटले पुन्हा सुरू करण्याचा केंद्राचा निर्णय

June 13, 2016 9:58 AM0 commentsViews:

1984_delhi_roits13 जून : 1984च्या शीखविरोधी दंगलींसंबंधी 75 खटले पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. या दंगलीमध्ये एकूण 3 हजार 325 जणांचा मृत्यू झाला होता. एकट्या दिल्लीमध्ये 2 हजार 733 जण ठार झाले होते.

पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होताहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. या दंगलींच्या चौकशीच्या नावाखाली आतापर्यंत धूळफेक झाल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. पंजाब विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. हे पत्र त्याचाच एक भाग असल्याचं मानलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा