व्ही. के. सिंग नवे लष्करप्रमुख

March 31, 2010 10:48 AM0 commentsViews: 1

31 मार्च चीफ ऑफ आर्मी स्टाफ अर्थात लष्कर प्रमुख जनरल दिपक कपूर आज निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर भारतीय सैन्याचे 25 वे लष्करप्रमुख म्हणून जनरल व्ही. के. सिंग आज सूत्रे हाती घेणार आहेत. सिंग हे राजपूत रेजिमेंटचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होणारे दुसरे अधिकारी आहेत. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. नवीन लष्करप्रमुखांसमोर अनेक आव्हाने आहेत.पाकिस्तानकडून वाढणार्‍या अतिरेकी कारवायांसोबतच, भारतीय सैन्याला खास करून तोफखान्यांना आधुनिक करणे, तसेच भारतीय सैन्यामार्फत चालवण्यात येणार्‍या संस्थांबाबत जनतेत विश्वास वाढवणे, या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.

close