कोल्हापुरात महालक्ष्मीचा रथोत्सव

March 31, 2010 10:56 AM0 commentsViews: 1

31 मार्चकोल्हापुरात महालक्ष्मीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 450 किलो चांदीचा रथ या वर्षीचे खास आकर्षण होते. भक्तांनी अर्पण केलेल्या 450 किलोच्या चांदीपासून हा रथ बनवण्यात आला. सव्वा कोटी किंमतीचा हा रथ पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आकर्षक आतषबाजी, प्रभात कंपनीचा बँड आणि रथोत्सोव मार्गावरील रांगोळ्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. रथोत्सव मार्गावर भक्तांनी हार, फुले आणि आरती ओवाळून लक्ष्मी मातेचे स्वागत केले. यावेळी संपूर्ण मार्गावर आतषबाजी करण्यात आली.

close