राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर !

June 13, 2016 2:22 PM0 commentsViews:

mansoon in keral3413 जून : केरळमध्ये मागच्या आठवड्यातच मान्सून दाखल झालाय. कर्नाटकातही तो पोहोचलाय. पण, दुष्काळानं होरपळणार्‍या आणि पाणीटंचाईचं संकट झेलणार्‍या महाराष्ट्राला मात्र मान्सूनसाठी अजून तब्बल आठवडाभर वाट बघावी लागणार आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 8 दिवसांनी मान्सून पोहोचणार आहे, म्हणजेच जून महिन्याचे पहिले 3 आठवडे संपल्यानंतर राज्याला नियमित पाऊस लाभण्याची शक्यता आहे. सध्याचं हवामान आणि स्थिती मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल नाही, त्यामुळे राज्यातल्या मान्सूनचं आगमन लांबलं असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.

मराठवाड्यातला शिल्लक पाणीसाठा

औरंगाबाद – 3 टक्के
परभणी – 4 टक्के
जालना – 0 टक्के
बीड – 0 टक्के
उस्मानाबाद – 0 टक्के
लातूर – 0 टक्के
नांदेड – 1 टक्के

कोल्हापूर जिल्ह्यातला पाणीसाठा
जिल्ह्यात एकूण धरणे – 14
4 धरणात 10 टक्के पाणी
3 धरणात 15 टक्के पाणी
राधानगरी 4 टक्के
तुळशी 12 टक्के


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा