26/11चा निकाल 3 मे रोजी

March 31, 2010 11:35 AM0 commentsViews: 2

31 मार्च26/11 च्या खटल्याच्या निकाल आता 3 मे रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील दुसरा आरोपी सबाउद्दीन आणि फहीम अन्सारी या दोन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद आज झाला. कसाबने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपला जबाब वारंवार बदलला. पण त्याच्या नौटंकीचा खटल्याच्या निकालावर कोणताच परिणाम होणार नाही, असे विशेष सककारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 26/11 चा खटला अजून संपलेला नाही. योग्यवेळी आम्ही हेडली विरोधात चार्जशीट दाखल करू असे, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी म्हटले आहे. कसाबवर खटला सुरू असताना, तो वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिला. या खटल्यादरम्यान कसाबने अनेक नाटके केली. काय होती त्याची नाटके त्यावर एक नजर टाकूयात…कसाबने त्याच्या जेवणाचे ताट फेकून दिले. साधे जेवण नाकारून त्याने मटन-बिर्याणीची मागणी केली आपल्याला दररोज वर्तमानपत्र दिले जावे अशीही मागणी त्याने केलीरमझानच्या महिन्यात उर्दू कॅलेंडर आणि एक अलार्मचे घड्याळ त्याला हवे होते. पण कसाबच्या सर्व मागण्या फेटाळण्यात आल्या सुरुवातीला कसाब एखाद्या व्यक्तीची साक्ष सुरु असताना मध्येच हसायचा. कधी आपल्या वकिलाकडे बघून हसायचा. तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पहात हसायचात्याने दोनदा स्वतःचा कबुलीजबाब नाकारला

close