मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात मोठे खातेबदल होण्याची शक्यता

June 13, 2016 5:01 PM0 commentsViews:

devendra-fadnavis661

13 जून : राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नुसताच चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर आता तातडीने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावलं टाकली आहेत. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोठे खातेबदल होण्याची शक्यता आहे. तसंच, कुणाला डच्चू मिळाणार?, मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहर्‍याचा समावेश होणार याविषयी सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या विस्तारात अनेक मंत्र्यांवरचा पदाचा भार कमी होण्याची शक्यता आहे.

अपेक्षित खांदेपालट

  • गिरीश महाजन – वैद्यकीय शिक्षण + अतिरिक्त जबादारी
  • पंकजा मुंडे – जलसंधारण विभागाचा भार होऊ शकतो हलका
  • विनोद तावडे – वैद्यकीय शिक्षणाचा भार होणार हलका
  • राजकुमार बडोले – अल्पसंख्यांक विभागाची भर
  • राम शिंदे – कॅबिनेटपदी बढतीची शकयता
  • दिलीप कांबळेंना कॅबिनेटपदी बढती उत्पादन शुल्कची जबाबदारी
  • चंद्रकांत पाटील – वस्त्रोद्योग आणि पणनचा भर होऊ शकतो हलका

भाजपची प्रदेश कार्यकारिणी 18 आणि 19 जूनला पुण्यात होत असून, तोपर्यंत तरी विस्तार होणार नाही. मात्र कार्यकारिणीच्या बैठकीनंतर 20 किंवा 21 जूनला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रिपद, दोन राज्यमंत्रिपदे आणि महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवायची असल्याने शिवसेनेला कोणतेही आणखी लाभ देऊ नयेत, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे दोन दुय्यम खात्यांच्या राज्यमंत्रिपदांव्यतिरिक्त शिवसेनेला फारसे काहीही मिळण्याची शक्यता नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा