एक्स्प्रेस वेवरी वाहतुक खोळंबली, पुण्याकडे जाणार्‍या दोन्ही लेन बंद

June 13, 2016 6:32 PM0 commentsViews:

mumbai_pune_expressway_traffic_jam (8)

13 जून :  सततच्या होणार्‍या अपघातांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार्‍या वाहतुकीचा खोळंबा अजूनही कायम आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी पुण्याकडे जाणार्‍या दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खंडाळ्याच्या घाटात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पुण्याकडे जाणार्‍या वाहनांच्या रांगांमुळे आख्ख्या घाटात वाहतूक मुंगीच्या गतीनं पुढे सरकत आहे.

अमृतांजन पुलाजवळ कायमच वाहनांचा खोळंबा होतो. तर काल सिमेंटचा मिक्सर उलटल्याने इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यावर कडी म्हणजे दोन लेन बंद झाल्यानं वाहतुकीचा बोर्‍या वाजला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा