मध्य मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

June 14, 2016 8:54 AM0 commentsViews:

water-shortage MUMBAIमुंबई -14 जून : मध्य मुंबईत उद्या (बुधवारी) पाणी पुरवठा बंद असणार आहे. सेनापती बापट मार्गावरील तानसा पाईपलाईनच्या गळतीच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येणार असून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आठ ते परवा सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल, कस्तुरबा हॉस्पिटल, धोबी घाट, सात रस्ता, एन.एम जोशी मार्ग, प्रभादेवी,एल्फिन्स्टन रोड, सेनापती बापट रोड, गोखले रोड, सेना भवन परिसरात पाणी पुरवठा पूर्णपणे खंडीत राहणार आहे.. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगर पालिकेनं केलंय.

या भागात होणार पाणी कपात

मुंबई सेंट्रल
कस्तुरबा हॉस्पिटल
धोबी घाट
सात रस्ता
एन.एम जोशी मार्ग
प्रभादेवी
एल्फिन्स्टन
सेनापती बापट रोड
गोखले रोड
सेना भवन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा