राज ठाकरेंचा आज वाढदिवस..,पुष्पगुच्छ देण्याऐवजी रोपं द्या !

June 14, 2016 9:06 AM0 commentsViews:

raj_thackery_birthdayमुंबई – 14 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे..यानिमित्त त्यांच्या दादरमधील कृष्णकुंज या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमत असते. मात्र, यावर्षी राज यांनी कार्यकर्त्यांना सोबत येताना पुष्पगुच्छ ऐवजी झाडाचं रोपटं आणायचे आदेश दिले आहे.

हे रोपटं स्विकारून राज कार्यकर्त्यांना हेच रोपटं परत देणारे आहे. त्यानंतर त्यांनी हे रोपटं त्यांच्या भागात जाऊन लावावं असं त्यांना सांगण्यात आलंय. राज्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती टाळायची असेल तर वृक्षारोपण करण्याचा पर्याय नाही. त्यामुळे राज यांनी वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त वृक्षांचं रोपण करण्याचे आदेश दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा