थरारक, लोकलच्या टपावरचा प्रवास तरुणाच्या जीवावर बेतला

June 14, 2016 11:40 AM0 commentsViews:

मुंबई -14 जून : लोकलच्या टपावरून प्रवास करू नका अशी वारंवार सुचना दिली जाते पण त्याकडे काही हौशी प्रवाशी दुर्लक्ष करता आणि जीवाला मुकतात. अशीच एकच घटना बोरीवली रेल्वे स्टेशनवर घडलीये. लोकलच्या टपावरून प्रवास करणार्‍या एका तरूणानं पेट घेतल्याची घटना घडलीय.local_mumbai

नालासोपार्‍याच्या या तरुणातचं नाव राजेंद्र प्रभु दिघे असं असून त्याचं वय 25 वर्ष आहे. 6 जूनची ही घटना आहे. लोकलच्या टपावर बसलेल्या या युवकाला 25 हजार व्होल्टचा वायरचा धक्का लागला आणि त्यानं पेट घेतला. प्लॅटफॉर्म वरच्या प्रवाशांनी मोठ्या मुश्किलीने त्याला खाली उतरवलं. पण तो 80 टक्के भाजला होता. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा