मुक्या जीवाशी जीवघेणी गंमत, अज्ञातांनी माकडाला पाजली दारू !

June 14, 2016 1:03 PM0 commentsViews:

ठाणे – 14 जून : मानवातील माणुसकी लोप पावत चालली आहे की काय असे वाटावे अशी घटना ठाण्यातील सिडको भागात घडली आहे. काही समाजकंटकांनी एका निष्पाप माकडाला दारू पाजली असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. हे माकड गेले दोन दिवस या भागात फिरत होते. दारू प्यायल्यामुळे अत्यंत अशक्त आणि कृश अवस्था या माकडाची झालीये.

thane_monkeyअत्यंत नशेमध्ये हे माकड गेले कित्येक तास एका छपरावर असून ते खाली उडी मारेल तर मरूही शकते अशी भीती काही नागरिकांनी व्यक्त केली. परंतू, याहून संतापजनक बाब म्हणजे अशा भरकटलेल्या वन्यजीवांचे रक्षण आणि पुनर्वसन करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. पण वनविभागाचे कंट्रोल रूमला फोन लावला असता कुणी फोन उचलतंच नसल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता काय करायचे हा मोठा यक्षप्रश्न सर्व नागरिकांसमोर पडला आहे. या माकडाला लवकरात लवकर येथून नेऊन योग्य ते उपचार करून त्याला मनुष्यवस्तीपासून दूर सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा