कायम विनाअनुदानित शाळांना मिळणार 20 टक्के अनुदान

June 14, 2016 1:28 PM0 commentsViews:

techer_school14 जून : कायम विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनुदानास पात्र घोषित झालेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळानं आज याला मान्यता दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे 90 टक्के शाळांना आता 20 टक्के अनुदान मिळणार आहे. यामुळे 194 कोटींचा बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. ह्या निर्णयामुळे राज्यातल्या हजारो शिक्षकांना फायदा होणार आहे. कमी पगार आणि नोकरीची शास्वती नाही, अशा दुहेरी समस्येत आज हजारो शिक्षक आहे. या निर्णयामुळे त्यांचं वेतन नक्की होईल, आणि ते वेळेवर मिळेल, अशी अपेक्षा आहे. दोनच दिवसांपासून जालन्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षक गजानन खरात यांचा उपोषणानंतर मृत्यू झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा