आयआयटी परीक्षेत पास झाला म्हणून 30 लाखांची बीएमडब्ल्यू कार भेट

June 14, 2016 2:25 PM0 commentsViews:

14 जून : परीक्षेत पास झाला तर काही तरी देण्याचं आमिष पालक आपल्या पाल्याला देत असता. पण, जर 30 लाखांची बीएमडब्ल्यू कारचं गिफ्टमध्ये मिळाली तर…हो हे घडलं राजस्थानमध्ये…राजस्थानच्या एका कोचिंग क्लासनं आपल्या विद्यार्थ्याला चक्क 30 लाखांची बीएमडब्ल्यू गाडी भेट दिलीय.BMW

आयआयटी प्रवेश परीक्षेत देशात 11वा आलेल्या तन्मय शेखावतला बीएमडब्ल्यू एक्स वन ही 30 लाखांची गाडी भेट म्हणून देण्यात आलीये. कोचिंग क्लासनं आधीच आश्वासन दिलं होतं की पहिल्या 20मध्ये रँक आला तर बीएमडब्ल्यू दिली जाईल.. निकाल लागल्यावर क्लासनं आपला शब्द पाळला, आणि तन्मयला ही सुंदर गाडी भेट दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा