कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगी जखमी

March 31, 2010 2:09 PM0 commentsViews: 1

30 मार्चमोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच वर्षांची मुलगी जबर जखमी झाल्याची जळगावात घडली आहे. शहरातील म्हाडा कॉलनी या रहिवासी भागात ही घटना घडली आहे. धावनी पाटील असे या मुलीचे नाव आहे. तिच्या दोन्हीही पायांना कुत्र्यांनी असंख्य चावे घतले आहेत. पालिका प्रशासन मात्र याबाबत काहीही करू शकत नाही. कारण प्राणीमित्रांच्या मागणीनुसार जळगाव शहरात गेल्या 10 वर्षांपासून मोकाट कुत्रे मारण्याची मोहीम बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षात शहरात कुत्रे चावण्याच्या तेराशेहून अधिक घटना घडल्या आहेत.

close