आयसीसचा म्होरक्या अबू अल बगदादी ठार ?

June 14, 2016 3:30 PM0 commentsViews:

abu_bagdadi14 जून : आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार झाल्याचं वृत्त आहे. नाटो फौजांच्या हल्ल्यात बगदादीचा सीरियात खात्मा झाल्याची अरब न्यूज एजन्सीनं माहिती दिलीये. परंतु, अमेरिकेकडून या बातमीला अजून दुजोरा नाहीये. या आधीही बगदादी ठार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

इराकच्या स्टेट मीडिया आणि तुर्कीतील येनिस सफकने आयएस अरब न्यूज एजन्सी अल अमाकने हे वृत्त प्रसिद्ध केले असून रविवारी
नाटोच्या हल्ल्यात बगदादी ठार झालाय. याआधीही इराक स्थानिकी टीव्ही चॅनल एल सुमेरियानेही आयसीसच्या ताब्यात असलेल्या मोसुलमध्ये हवाई हल्ल्यात बगदादी जखमी झाला होता. मात्र, सीएनएन नेटवर्कच्या माहितीनुसार बगदादीच्या ठार झाल्याच्या बातमी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी अजून दुजोरा दिला नाही.

कोण होता बगदादी?

- संपूर्ण नाव – अबु बक्र अल बगदादी
- आयसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा प्रमुख
- अल कायदाच्या इराक विभागाचा म्होरक्या होता
- 16 मे 2010 – अबु ओमर अल बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसचा नेता
- 2 मे 2011 – ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर लादेनची स्तुती करणारं पत्र
- सीरियामधल्या यादवीनंतर 8 एप्रिल 2013 ला ‘आयसिस’ची स्थापना
- 2014मध्ये सीरिया आणि इराकमध्ये खलिफ म्हणून घोषित केलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा