पावसाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक राज्यसभेत येण्याची शक्यता

June 14, 2016 4:34 PM0 commentsViews:

GST Bill

14 जून : बहुप्रतीक्षित जीएसटी विधेयक यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत येण्याची शक्यता आहे. राज्यसभेत एनडीएची ताकद वाढल्यानं हे विधेयक मंजूर हाईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.

देशात असलेल्या विविध राज्य तसंच केंद्रीय करांची जागा घेणार्‍या जीएसटी विधेयक यापूर्वीच लोकसभेत मंजूर झालं असून ते राज्यसभेतही संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

राज्य आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांची बैठक झाली. त्यात तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांनी जीएसटीला पाठिंबा दिल्याची माहिती अरुण जेटलींनी दिली. सर्व राज्यांच्या समस्यांचा केंद्रानं विचार केल्याचं म्हटलं आहे. त्यात महसुलीची विभागणी कशी करायची याचाही समावेश आहे. पुढच्या महिन्यात केंद्रानं या मुद्द्यावर आणखी एका बैठकीचं आयोजन केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा