मारूति – 800 होणार रिटायर

March 31, 2010 2:15 PM0 commentsViews: 3

31 मार्चभारतीय कार मार्केटवर सलग 25 वर्ष अधिराज्य गाजवणारी मारुती – 800 गाडी एक एप्रिलपासून आता इतिहासजमा होणार आहे. एमिशन नॉर्म्स पूर्ण करू न शकल्याने कंपनीने या गाडीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला, मुंबई, दिल्ली, कानपूरसह देशातील 13 शहरांतून या गाडीची विक्री बंद केली जाणार आहे. डिसेंबर 1983 मध्ये मारु ती सुझुकी कंपनीने मारुति 800 ही स्मॉल कार सेगमेंटमधील गाडी लॉन्च केली होती. फार थोड्याच वेळात फॅमिली कार म्हणून या गाडीने लोकप्रियता मिळवली होती.