नंदूरबार जिल्ह्यातल्या तब्बल 81 विहिरी गायब?

June 14, 2016 6:07 PM0 commentsViews:

निलेश पवार, नंदूरबार
14 जून :  शेतकर्‍यांच्या नावावर जमिनी, अनुदानं असल्याचं दाखवून ती गायब होणं हे तर नेहमीचंच. पण शेतकर्‍यांच्या शेततातून विहीरीच गायब झाल्या आहेत. नंदुरबारमध्ये शासकीय अधिकार्‍यांनी हा चमत्कार घडवला आहे.

nandurbad123

जाऊ तिथे खाऊ…मकरंद अनासपुरेच्या या चित्रपटात विहीरी चोरीला गेल्याचं दाखवलंय. असाच प्रकार नंदुरबारमध्ये प्रत्यक्षात घडलाय.नंदुरबारमधल्या तळोदा तालुक्यातल्या उमरकुवा गावात एक दोन नाही तर तब्बल 81 विहीरी गायब झाल्यात या विहीरी कागदोपत्री आहेत. पण प्रत्यक्षात मात्र सापडतच नाही आहेत. किंबहुना ज्यांच्या नावावर या विहीरी आहेत त्या लाभार्थ्याना याचा पत्ताही नाही आहे. वनहक्क कायद्याअंतर्गत वनपट्टे मिळालेल्या दोन आदिवासी शेतकर्‍यांच्या नावावर प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या विहीरी कागदोपत्री दाखवण्यात आल्यात. पण त्यांना याची माहितीही नाही.

नेमक्या या विहीरींबाबत काय झालंय ?

  • 2012 ते 2015 पर्यंत उमरकुवा गावातल्या 81 विहीरी कागदोपत्री दाखवण्यात आल्यात
  • पण या विहीरी प्रत्यक्षात कुठेच अस्तित्वात नाहीत
  • 1 कोटी 85 लाख रुपयांचा अपहार झाल्याचं उघड.
  • आदिवासी विकास विभागाकडून दिले जाणार पैसे कृषी जिल्हा परिषदेमध्ये जमा झालेच नाहीत
  • मनरेगा कृषी विभागाच्या एका अधिकार्‍यानं बनावट शिक्यांच्या आधारे अपहार केल्याचं उघड
  • लोकसंघर्ष मोर्चानं आवाज उठवल्यावर मग शोधाशोध सुरु झाली
  • त्यानंतर लाभार्थ्यांना आपल्या नावावरचे हे पैसे लाटल्याचं समजलं

त्यानंतर मग विहीरींबाबत चौकशी सुरू झाली.

महत्त्वाचं म्हणजे हा अपहार करणारा अधिकारी सध्या सेवानिवृत्तीच्या तयारीत आहे. अजूनपर्यंत याअधिकार्‍यावर कारवाईच झालेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा