दिघावासीयांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच, शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

June 14, 2016 8:25 PM0 commentsViews:

illegal-buildings

14 जून :  पावसाळा असल्याने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलण्याची एमआयडीसीची विनंती मुंबई हायकोर्टाने आज (मंगळवारी) फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिघ्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार हे आता निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

एमआयडीसीच्याच जागांवरील अतिक्रमित बांधकामांवर जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात कुठलीही कारवाई करू नये हा शासननिर्णय असल्याने नेमकं काय करावं या संभ्रमात असलेल्या एमआयडीसीने सोमवारी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, पावसाळ्यात इमारतीवर कारवाई शक्य नसली तरी या इमारती ताब्यात घेता येतील, असं कोर्टाने आजच्या निकालात म्हटलं. त्यानुसार, कमलाकर आणि पांडुरंग या इमारतींचा ताबा उद्याचा घ्यावा, असंदेखील कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितलं आहे. कोर्टाच्या या भूमिकेमुळे दिघावासियांच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा