ईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत – भुजबळ

June 14, 2016 10:25 PM0 commentsViews:

bhujbal discharge

14 जून :   बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीद्वारे सादर केलेला मेडिकल रिपोर्ट माझा नसून इतरांचा, मेडिकल रिपोर्ट सादर करुन मला फीट घोषित करण्यात येत आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी कोर्टात केला आहे. याप्रकरणी ईडी शुक्रवारी हायकोर्टात उत्तर देणार आहे.

छगन भुजबळ यांनी वैद्यकीय कारणांसाठी मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर भुजबळांच्या मेडीकल तपासणीसाठी जेजे रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पॅनल तयार केलं आहे. मात्र, या डॉक्टरांकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये माझी जन्मतारीख 24 मे 1947 अशी लिहीली आहे. पण वास्तवात ती 15 ऑक्टोबर 1947 आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती चुकीची असल्याचं भुजबळ यांचे वकीलांनी हायकोर्टात म्हटलं आहे.

दरम्यान, यावर ईडीला उत्तर देण्यासाठी न्यायालयानं गुरुवारपर्यंत वेळ देण्यात आला असून पुढील कारवाई गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा