परत येतेय ‘गँग्ज ऑफ वासेपूर 1.5′ !

June 15, 2016 8:36 AM0 commentsViews:

gang_of_wasseypur315 जून : मनोज वाजेपयी, नवाझुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी आणि रिचा चड्डा या स्टारकास्ट मंडळीने धुमाकूळ घातलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सिनेमाच्या सीरीजमधला तिसरा भाग लवकरंच रिलीज होणार अशी चर्चा गेले अनेक दिसांपासून सुरू आहे. अखेर या सिनेमाच्या तिसर्‍या भागावर काम सुरू झालंय.

या सिनेमाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. आणि लवकरंच ती फायनल केली जाईल. पण हा भाग जरी तिसरा असला तरी याला ‘गँग्ज ऑफ वासेपूर 3′ असं न म्हणता ‘गँग्ज ऑफ वासेपूर 1.5′ असं म्हंटलं जाणार आहे. कारण, हा सिनेमा या आधीच्या दोन्ही भागांच्या मधला असेल आणि कथा थोडी वेगळी असेल असं सिनेमाचा लेखक दिग्दर्शक झिशान काद्री यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close