सीमाभागातील नेत्यांचा इशारा

March 31, 2010 2:31 PM0 commentsViews: 12

आशिष जाधव, मुंबई31 मार्चबेळगावचे महापौरपद मराठी माणसाला मिळू नये यासाठी कर्नाटक सरकारने महापौरपदाच्या निवडणुकीत लोकशाहीचा गळा घोटला. या घटनेचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. तर याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने लक्ष घातले नाही तर, विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्याचा सीमाभागातल्या नेत्यांनी दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत बेळगाव, निपाणी कारवार, धारवाड या सीमाभागात मराठी माणसाचा आवाज दाबायचा, असे धोरण कर्नाटक सरकार जोमाने राबवत आहे. बेळगावच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहा मराठी नगरसेवकांचे अर्ज अवैध ठरवून कन्नड महापौर बिनविरोध निवडून आणला गेला. मराठी जनांच्या या मुस्कटदाबीचे तीव्र पडसाद दोन्ही सभागृहात उमटले. तर शिवसेनेने बाहेर कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपलाच घरचा आहेर दिला.बेळगाव प्रश्नावर महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात लढाई लढत आहे. पण जोवर निकाल येत नाही, तोवर संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली. त्यावर सीमीप्रश्नाबाबत सरकारही जागृत असल्याचे सरकारने स्पष्ट केले.या अन्यायाविरुद्ध सीमाभागातील कार्यकर्ते अखेर दाद मागण्यासाठी मुंबईत सरकारकडे आले. त्यांनी महाराष्ट्र सरकारलाही सज्जड इशाराही दिला. राज्यात वेगळ्या विदर्भाची मागणीने जोर पकडला असताना संयुक्त महाराष्ट्रासाठीही विधिमंडळाततीव्र पडसाद उमटले, ही नक्कीच स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल.

close