अवैध उत्खनन प्रकरणी 137 कोटींचा दंड टाळण्यासाठी भाजप नेत्याची धडपड

June 15, 2016 12:57 PM0 commentsViews:

15 जून : भिवंडी तालुक्यातल्या दापोडा इथं संपूर्ण डोंगर पोखरुन गौण खनिजाचं उत्खनन केल्याप्रकरणी भाजपचे नेते आर सी पाटील आणि त्यांचा मुलगा अनिल पाटील यांना 137 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. पण हा दंड पाटील यांनी भरलाच नाही. उलट हे खोदकाम बुजवण्यासाठी डेब्रिजचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

bhivandi3भिवंडी तालुक्यात कोट्यवधीचा महसूल चुकवण्यासाठी भाजपचे नेते आर सी पाटील यांची धडपड सुरू आहे. आर सी पाटील आणि त्यांचा मुलगा अरुण पाटील यांनी हे अनधिकृत उत्खनन केलं. या डोंगरातून 6 लाख 46 हजार 331 ब्रास दगड या गौण खनिजाचं अनधिकृतरित्या उत्खनन करण्यात आलं. हे गौण खनिज आयआरबीच्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलं.

या खनिजातून पाटील यांना दोन हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप होत आहे. 15 जून 2015 ला महसूल विभागानं पाटील यांना 137 कोटी 82 लाख 80 हजार 503 दंड ठोठावला. आर सी पाटील हे पूर्वी आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते तर त्यांचा मुलगा अरुण पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष होता. भाजप सरकार आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे आम्ही असे उदाहरण पहावयास मिळत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा