बंधारे तुडुंब, शिव’जलक्रांती’ ड्रोन कॅमेर्‍यातून

June 15, 2016 2:51 PM0 commentsViews:

उस्मानाबाद – 15 जून : दुष्काळाची सर्वात जास्त झळ ही मराठावाड्याला बसलीय. मात्र आता हे चित्र काहीसं बदलताना दिसतंय. कारण, उस्मानाबादमधील परांडा तालुक्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शिवजलक्रांती योजनेद्वारे नद्यांपाशी केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात पाणी साठू लागलंय.shivjalkranti

या योजनेला तानाजी सावंत प्रतिष्ठान मार्फत मदतही करण्यात आली. त्यामुळे जवळपास 200 ओढे आणि नदी नाल्यांच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलंय. तसंच जवळपास 150 किलोमीटर लांबीच्या नदी आणि नाल्यांचं कामही करण्यात आलं. या कामाचं ड्रोन कॅमेर्‍यांच्या सहाय्याने झालेलं चित्रीकरण हे अत्यंत नैत्रसुखद आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा