नालेसफाईच्या नव्या कंत्राटांची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय पैसे देऊ नयेत – अजॉय मेहता

June 15, 2016 4:16 PM0 commentsViews:

ajoy mehta

15 जून :  मुंबईत रस्ते आणि नाल्यांच्या घोटाळ्यात चौकशी सुरू असणार्‍या कंत्राटदारांना नवे कंत्राट मिळाले असले, तरी या दोन्ही प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही स्वरूपाची रक्कम ही कंत्राटदारांना अदा करु नये असे आदेश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिला आहे.

मुंबईत गेल्यावर्षीच्या नालेसफाईच्या घोटाळ्यात अडकलेल्या कंत्राटदारांना यावर्षी पुन्हा नालेसफाईची कंत्राटं देण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली होती. बीएमसीनं दोनवेळा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाले सफाईच्या कामाला उशिर होतोय या कारणामुळे एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा त्याच कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 105 कोटीचे कंत्राट बीएमसीला फसवणार्‍या कंत्राटदारांना देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

मुंबईतली नालेसफाई

– मोठ्या नाल्यांसाठी निविदा काढून 70 कोटींची कामं
– छोट्या नाल्यांसाठी प्रत्येकी 1.64 लाख खर्चाची परवानगी
– रस्त्यालगतच्या नाल्यांसाठी प्रत्येकी 2.35 लाख खर्चाची परवानगी
– मिठी नदीसाठी 35 कोटी वेगळ्या खर्चाची तरतूद

मुंबईतली नालेसफाई – कंत्राटदारांवर मेहेरबानी

– मिठी नदीसाठी एन.ए. कन्स्ट्रक्शन आणि एस.एन.बी. इन्फ्राला 27 कोटींचं कंत्राट
– पूर्व उपनगरांमध्ये अनास आणि लादाजी – 14 कोटींचं कंत्राट
– पश्चिम उपनगरांमध्ये मुकेश, एन.बी. ब्रश, लादाजी, आशापुरा – 27.7 कोटींचं कंत्राट
– मोना एंटरप्रायझेस – 6 कोटींचं कंत्राट
– क्रिस्टल कन्स्ट्रक्शन – 4 कोटींचं कंत्राट
– भारती कन्स्ट्रक्शन – 4 कोटींचं कंत्राट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा