शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने बँक कर्मचार्‍याच्या भडकावली कानशिलात

June 15, 2016 7:09 PM0 commentsViews:

15 जून :  यवतमाळमध्येआर्णी येथे सेंट्रल बँकच्या कर्मचार्‍याने शेतकर्‍याला पिक कर्जासाठी पैशाची मागणी केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या पदाधिकारी प्रवीण शिंदेंनी सेंट्रल बँकेच्या कर्मचार्‍याच्या कानशिलात भडकावल्याची घटना घडली आहे.

sasdasakdh

एका शेतकर्‍यानं पीक कर्जाची मागणी केली होती. मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी अधिकार्‍यानं पैसे मागितल्याचा आरोप आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे आपल्या कार्यकर्त्यासह बँकेत पोहोचले. मात्र कर्मचार्‍याच्या उद्धट वागणुकीमुळे शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी कर्मचार्‍याच्या कानशिलात भडकावली. तसंच सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, सर्वाधिक आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात 4 वर्षांपासून दुष्काळी स्थिती असून संकटग्रस्त शेतकर्‍यांची बँक आणि प्रशासनाकडून पीक कर्जासाठी अडवणूक सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. तसंच दलालांमार्फत कर्ज वाटपाचा फंडा वापरला जात होता असा आरोप शिवसेनेने केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा