जनगणना मोहीम उद्यापासून

March 31, 2010 2:47 PM0 commentsViews:

31 मार्च महत्त्वांकाक्षी राष्ट्रीय जनगणना मोहिमेला उद्यापासून सुरुवात होत आहे. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून या योजनेला सुरुवात होईल. या जनगणनेनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र आणि विशिष्ट नंबर मिळणार आहे. देशातील 120 कोटी लोकसंख्येला एकाच डाटाबेसमध्ये आणण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या जणगनेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- योजनेत 25 लाख लोक गुंतलेयोजनेचा खर्च – 2 हजार 200 कोटी रु. प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय ओळखपत्र मिळणार पहिल्यांदा मोबाईल फोन, कॉम्प्युटर, इंटरनेटधारकांची माहिती जमवणार प्रत्येकाचे फिंगरप्रिंट आणि फोटोग्राफ घेण्यात येणार देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी योजना आखणार नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर तयार करणार एकाच डाटाबेसखाली प्रत्येक नागरिकाची माहिती प्रत्येकाचा फोटो सरकारकडे असणार प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती सरकारकडे असणार प्रत्येक नागरिकाला विशिष्ट नंबर मिळणार भारताचे रजिस्ट्रार जनरल, जनगणना आयुक्त यांच्याकडे जबाबदारी जनगणना दोन टप्प्यांत होणार पहिल्या टप्प्याचे नाव – घरकुल गणनाघरकुल गणना एप्रिल ते जुलैमध्ये होणार दुसरा टप्पा – लोकसंख्येची आकडेवारी जमवणे दुसरा टप्पा 9 ते 28 फेब्रुवारी 2011 दरम्यान जनगणनेत 640 जिल्हे, 5,767 तालुके, 7 हजार 742 शहरे, 6 लाख गावांचा समावेश 24 कोटींपेक्षा जास्त घरांना भेट देणार 120 कोटी लोकांची आकडेवारी जमवण्यात येणार

close