राजकारण्यांनी जमीन हडपल्याचे सरकारला मान्य

March 31, 2010 2:57 PM0 commentsViews: 8

31 मार्चकोल्हापूरमधील शंकराचार्य करवीर पीठाची हजारो एकर जमीन अनेक राजकारण्यांनी हडपल्याचे सरकारनेच मान्य केले आहे. या संस्थेच्या जमिनी अवैधरित्या हडपणार्‍यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचासुद्धा समावेश आहे. याप्रकरणाची 3 महिन्यात चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन महसूल मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेत दिले.अधिवेशनात इतर कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर नजर टाकूया…अवकाळी पाऊसग्रस्तांना मदतफयानग्रस्तांना ज्याप्रमाणे मदत देण्यात आलीये, त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली जाईल. तसेच राज्यात फुलशेतीला चालना देण्यासाठी फ्लोरिकल्चर पॉलिसी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत केली. महागाईबाबत समन्वय नाहीराज्यातील महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबाबत केंद्र आणि राज्यसरकारमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला.केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी महागाई कमी करण्यासाठी 11 सूत्री कार्यक्रम तयार केल्याची घोषणा केली. पण त्याबाबतची माहिती नसल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. यावरून केंद्र आणि राज्यात समन्वय नसल्याचे आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.रॅगिंगचे पडसाद विधानसभेतमुंबईतील केईएम हॉस्पिटलमधील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये 10 विद्यार्थ्यांवर झालेल्या रॅगिंगचे पडसाद विधानसभेत उमटले. प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. दीपक सावंत आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले.चवदार तळ्याची दुरुस्ती करणार महाडमधल्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिले. या तळ्याच्या भिंतीची पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेत. तसेच तळाच्या पुनर्बांधणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित लोकांची बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

close