सुनील जोशीच्या मालमत्तेसाठी आवाहन

March 31, 2010 3:04 PM0 commentsViews: 2

31 मार्चकल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगररचना अधिकारी सुनील जोशीकडे सापडलेली मालमत्ता धक्कादायक आहे. त्याची आणखी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती सरकारला देण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत केले. शिवसेना आमदार किरण पावसकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आर. आर. पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले. सुनील जोशीकडे सापडलेले पैसे बेकायदेशीर कामाचे आहेत. ती कामे कोणती आहेत आणि ती कामे कुणी केली होती, याची सखोल चौकशी करण्यात येईल. आणि पात्रता नसताना सुनील जोशी याला क्रीम पोस्टींग कुणी दिली याचीही चौकशी करण्यात येईल, असेही आर. आर. यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची केलेली मागणी मात्र आर. आर. यांनी मान्य केली नाही. भ्रष्टाचारी आणि लाच घेणार्‍या अधिकार्‍यांची माहिती देणार्‍या लोकांना बक्षीस दिले जाईल, अशीही घोषणाही आर. आर. पाटील यांनी केली.

close