दिघ्यातील कमलाकर इमारतीतल्या 25 कुटुंबीयांच्या डोक्यावरचं छत हरवलं

June 15, 2016 11:10 PM0 commentsViews:

विनय म्हात्रे, नवी मुंबई

15 जून :  दिघा परिसरतल्या फक्त पांडुरंग या इमारतीलाच सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यामुळे इतर इमारतींवरची कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे. आजही कमलाकर ही इमारत ही खाली करण्यात आली. त्यामुळे या इमारतीमधली 25 कुटुंबं शब्दशः रस्त्यावर आली आहेत.

 

illegal-buildings

दिघ्यामधल्या अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांवर गेले कित्येक महिने टांगती तलवार आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर इथल्या रहिवाशांच्या डोक्यावरचं छप्पर हरवलं आहे. एखाद्याचा संसार उघड्यावर येतो म्हणजे नेमकं काय… याची व्यथा दिघ्याचे रहिवासी भोगत आहेत. या रहिवाशांपैकी संध्या बगातेंचे पती ड्रायव्हर आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते इथे राहतायत. प्रशासनाने रात्रीतून घर खाली करायला सांगितल्याने त्यांचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला आहे. रात्रीतून कुठेच सोय न झाल्याने त्यांना हा रस्त्यावरच आपला संसार थाटावा लागला आहे. कारण नव्या घराचं डिपॉझिट भरायलाच त्यांच्याकडे पैसे नाही.

कमलाकर इमारतीतली संध्या बगातेंसारखी अशी 25 कुटुंबं एका रात्रीत रस्त्यावर आली आहेत. आपलं घर सोडावं लागू नये यासाठी मोरेश्‍वर आणि भगतजी या इमारतींमधले रहिवासी सुप्रीम कोर्टात गेले. घरांमध्ये अपंग व्यक्ती असल्याची कैफियत त्यानी मांडली. त्यामुळे कोर्टाने त्यांना तात्पुरता का होईना दिलासा दिला आहे. या इमारतीवरच्या कारवाईला कोर्टाने 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. मुंबईत वरळीमधल्या कम्पॉकोला इमारतीच्या रहिवाशांनी त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवला. पण दिघ्याच्या रहिवाशांची घरंच अनधिकृत असल्याने त्यांना घर सोडावं लागलं. याला जबाबदार असणार्‍या नगरसेवकांवर आणि बिल्डरांवर मात्र काहीच कारवाई होत नाही आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा