सुट्टीनंतर शाळेत पुन्हा किलबिलाट, पुण्यात मुख्यमंत्र्यांनीही घेतला तास

June 15, 2016 9:13 PM1 commentViews:

15 जून : वेळ दुपारी 1 ची तर स्थळ होते पुण्यातील वाघोलीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. वर्ग होता पहिलीचा अन् शिक्षक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. होय!, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (बुधवारी) पुण्यातील एका शाळेत चक्क शिक्षक झाले अन् त्यांनी पहिलीचा तासही घेतला. यावेळी त्यांनी लहानग्या मुलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य दुष्काळाशी सामना करीत असताना ‘पाणी कसे मिळेल’ हा इयत्ता पहिलीतील बालभारतीच्या पुस्तकातील कथा सांगून आपण पाणी कसे मिळवले, टिकवले पाहिजे याबाबत संदेश दिला. अखेर त्यांना मुलांमधून सुंदर उत्तरे मिळाली अन् क्षणभर मुख्यमंत्रीही हरखून केले.

saddsadsay

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी शाळेत हजेरी लावली. तसंच विद्यार्थ्यांशी शिक्षक या नात्याने संवाद साधला. दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी पहिलीच्या वर्गावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुलांना पाणी मिळवणे आणि वाचवणे याबाबत कथा सांगितली.

राज्य सध्या दुष्काळाने हैरान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पहिलीच्या बालभारतीतील पुस्तकातील कसे मिळेल पाणी ही कथा सांगून पाण्याची समस्या आपण कशी सोडवू शकतो व संघटितपणे त्यावर काम केल्यास सर्व परिसर सुजलाफ सुफलाम बनू शकतो असा संदेश दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौथीच्या वर्गावरील मुलांशी संवाद साधला. त्यानंतर नव्याने शाळेत रूजू झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सर्व मुलांना चॉकलेट वाटप केले. काही वेळातच मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा शाळेतून बाहेर पडला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sandeep Tawde

    mukhyamantri saheb mumbai IES Ash Lane ya school madhe yaa tikade shikshnachya navakhali paise ghet aahe last year la 2nd std la rs.16000/- one year chi fee hoti aata yaa varshi 34000/- keli aahe na palkanchi meeting keli aamhi sagale palak shikshan mantri Vinodji Tawde Yanchya kade gelo pan tyanchya kadun kahi response bhetat nahi pls help kara