भुजबळांना जामीन की कोठडी ?, आज पुन्हा एकदा सुनावणी

June 16, 2016 9:12 AM0 commentsViews:

bhujbal_arrestedमुंबई – 16 जून : कोट्यावधींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आर्थर रोड तुरूंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेला वैद्यकीय अहवाल हा आपलाच होता की दुसर्‍याचा होता अशी शंका उपस्थित करत भुजबळ यांनी न्यायालयात वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळावा असा अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सादर केलेल्या अहवालातली जन्मतारीख ही आपल्या जन्मतारखेपेक्षा वेगळी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता या कारणावरून न्यायालय त्यांना जामीन मंजूर करतं अथवा नाही यावर आज सुनावणीवेळी चर्चा होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा