होऊ दे खर्च !, तासाभराचा विमान प्रवास फक्त 2500 रुपयांमध्ये

June 16, 2016 9:47 AM0 commentsViews:

flight316 जून : तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता विमान प्रवास रेल्वेच्या प्रवासापेक्षाही स्वस्त होणार आहे. कारण, तासाभराच्या विमानप्रवासाठी यापुढे कुठल्याही एअरलाईन्स कंपनीला 2500 रुपयांपेक्षा अधिक भाडं आकारता येणार नाही.

केंद्र सरकारच्या नव्या विमान वाहतूक धोरणांमध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती आणि या धोरणाला मोदी सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमानप्रवास करणार्‍यांना अच्छे दिन आल्याचं चित्र आहे. येत्या 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर मुंबई ते गोवा अथवा पुणे, कोल्हापूर असा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला फक्त 2500 रुपये मोजावे लागणार आहे.

नवीन हवाई वाहतूक धोरण

- तासाभराच्या प्रवासाला कमाल 2500 रु. भाडं
- देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवास तिकीट दरांवर 2 टक्के अतिरिक्त कर
- विमान वाहतूक क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत
- विमान देखभाल, दुरुस्तीवर शून्य टक्के सेवा कर, इंधन दरातही सवलत
- देशांतर्गत प्रवासाचे तिकीट रद्द झाल्यास प्रवाशांना पंधरा दिवसात पैसे परत
- आंतरराष्ट्रीय प्रवासाचे तिकीट रद्द केल्यास 30 दिवसात पैसे परत
- तिकीट रद्द केल्यास असलेले 200 रुपये शुल्क रद्द
- 24 तासांच्या आत फ्लाइट रद्द झाल्यास 10 हजार रुपये भरपाई
- 15 किलो पेक्षा जास्त सामानावर प्रति किलो 100 रुपये शुल्क रद्द

कुठल्या शहरांच्या विमानप्रवासांना या नवीन धोरणाच्या फायदा होणार ?

मुंबई – पुणे

मुंबई – सूरत

मुंबई – गोवा

दिल्ली – जयपूर

दिल्ली – लखनऊ

दिल्ली – चंडीगड

दिल्ली – देहरादून

दिल्ली – शिमला

कोलकाता – रांची

कोलकाता – भुवनेश्वर

हैदराबाद – विजयवाडा

हैदराबाद – तिरुपती

बेंगळुरू – कोईम्बतूर

बेंगळुरू – कोच्ची

दीव – पोरबंदर

कोच्ची – त्रिवेंद्रम
 
चेन्नई – बेंगलुरू

इंदौर – नागपूर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा