सचिन,गांगुली आणि लक्ष्मण ठरवणार टीम इंडियाचा कोच !

June 16, 2016 10:02 AM0 commentsViews:

sachin  ganguli16 जून : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या खांद्यावर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे.

सचिन, सौरव आणि लक्ष्मण या तिघांचा बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीत समावेश आहे. या समितीला मुख्य समन्वयक म्हणून माजी सचिव संजय जगदाळे यांची जोड देऊन बीसीसीआयचं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड भारतीय क्रिकेटच्या
बिग थ्रीवर सोपवली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी देशविदेशातून तब्बल 57 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बीसीसीआयच्या प्राथमिक निकषांनुसार त्यापैकी केवळ 21 अर्ज वैध ठरले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा