बायो मेट्रीकवर प्रश्नचिन्ह

March 31, 2010 3:09 PM0 commentsViews: 7

अमेय तिरोडकर, मुंबई31 मार्चराज्यातील सगळ्याच रेशन दुकानांवर बायो मेट्रीक व्यवस्था लागू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण रेशन व्यवस्थेतील अनागोंदी कारभारामुळे या नव्या सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात रेशन व्यवस्थेतील गोंधळ काही लपून राहिलेला नाही. राज्यात तब्बल अडीच कोटी रेशनकार्ड्स आहेत. त्यापैकी जवळपास बारा टक्के बोगस निघाल्याची माहितीही सरकार देते. आता यावरचाच उपाय म्हणून बायोमेट्रीकसिस्टीम लागू करण्यात येणार आहे.पण बायोमेट्रीक बद्दलही काही प्रश्न विरोधकांनी उचलून धरलेत.मुळात रेशनव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी बायमेट्रीक सिस्टीम आणली जाणार आहे, पण सरकारच्या यंत्रणेतच असलेले अनेक भ्रष्टाचारी दलालांपासून ही बायो मेट्रीक सिस्टीम तरी दूर राहणार का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

close