माणसावर हल्ल्याप्रकरणी 3 सिंहांना आजन्म कैद, 14 सिंहांची ‘सुटका’

June 16, 2016 12:01 PM0 commentsViews:

गुजरात – 16 जून : कायद्यापुढे सर्वच समान असं आपण नेहमी म्हणतो आता याला जंगलाची शान असलेला सिंह सुद्धा अपवाद ठरला आहे. जुनागड भागात माणसाच्या हत्येप्रकरणी चक्क 3 सिंहांना अटक करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल…पण हे खरं आहे. सिंहांच्या हल्ल्यात एका माणसाचा जीव गेला. त्यामुळे जुनागड वनविभागाने चक्क 17 सिंहांना अटक केली आणि त्यांना पिंजर्‍या बंद केलंय. एवढंच नाहीतर यापैकी 3 सिंहांना आजन्म कैदेची शिक्षाही सुनावण्यात आलीये. त्यामुळे या सिंहांना आता पिंजर्‍यात राहावं लागणार आहे.

lion_arrest1  गुजरातच्या गीर नॅशनल पार्कमध्ये आशियाई सिंह नरभक्षक झाले, त्यामुळे वन विभागाने कारवाई करत 17 सिंहांना पिंजर्‍यात बंद केलं. यातील एका सिंहाची नरभक्षक म्हणून ओळख पटलीये. या सिंहामुळे अमरेली जिल्ह्यातील आसपासच्या गावात दहशत पसरली होती. आता या सिंहाला पिंजर्‍यात बंद केल्यामुळे गावकर्‍यांचा जीव भांड्यात पडलाय. वन विभागाने या सिंहाची रवानगी प्राणी संग्रालयात केलीये.

वन अधिकार्‍यांची या प्रकरणाची चौकशी केली असता, अमरेली जिल्ह्यातील धारी तालुक्यात वन क्षेत्रात मुक्त वावर असलेल्या 17 सिंहांना पकडलं. ज्या ठिकाणी सिंहाने माणसांवर हल्ला केला त्या ठिकाणी सिंहांच्या पायाचे ठसे हे पकडलेल्या सिंहाशी मिळतेजुळते होते. तसंच एका सिंहाच्या विष्ठेत माणसाचे अवशेषही मिळाले. त्याचबरोबर दोन सिंहिणींच्या विष्ठेतही कमीप्रमाणात मानवी अवशेष मिळाले होते. या आधारे या तिन्ही सिंहांना नरभक्षक म्हणून घोषित करण्यात आलं.lion_arrest3

मार्च,एप्रिल आणि मे महिन्या वेगवेगळ्या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल आणि मे महिन्यात अमरेलीमध्ये सिंहांच्या हल्ल्यात 3 जण ठार झाले होते. यात 50 वर्षीय महिला, 61 वर्षीय वृद्धासोबत एका 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. सिंहांनी 6 जणांवर हल्ला केला होता. 17 सिंह हे गेल्या दोन महिन्यांपासून वन विभागाच्या ‘कोठडी’त होते. वन विभागाने 16 सिंहांना इथून हलवलंय. जानकारांच्या माहितीनुसार, गीर नॅशनल पार्कमध्ये फक्त 270 सिंहांना सामावून घेण्याइतकी क्षमता आहे. पण भविष्यकाळात हीच संख्या 500 हून अधिक असू शकते.lion_arrest2

जुनागड वन विभागाच्या अधिकार्‍यांनी स्थानिक वृत्तपत्रांना माहिती दिली की, चौकशीच्या अंती नर सिंह हा मुख्य हल्लेखोर होता. तर दोन सिंहिणींनी उरलेलं मानवी मांस खाल्लं होतं. या दोघी या हल्ल्यात सहभागी नव्हत्या. दोषी सिंहाला सक्करबाग प्राणीसंग्रालयात आजन्म पिंजर्‍यात ठेवण्यात येणार आहे. तर दोन्ही मादी सिंहांना वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आलाय. उरलेल्या 14 सिंहांना अभयारण्यात सोडण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close