पुण्यातही ‘दिघा’, मुढंवा परिसरात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टाचे आदेश

June 16, 2016 1:23 PM0 commentsViews:

ठाणे – 16 जून : नवी मुंबईत दिघा परिसरात अनधिकृत बांधकामांमुळे शेकडो कुटुंबियांना रस्त्यावर येण्याची वेळ आलीये. तशीच परिस्थिती आता पुण्यातील मुढंवा परिसरातील रहिवाशांवर आली असून हायकोर्टाने बेलेझा ब्ल्यू सोसायटीतील 54 फ्लॅट पाडण्याचे आदेश दिले आहे.pune_mundhava

बिल्डराने केलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे पुण्यात मुढंवा परिसरातील 54 कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मुंढव्यातल्या केशवनगर भागातील बेलेझा ब्ल्यू सोसायटीतले ए, बी आणि सी विंग मध पाचवा, सहावा आणि सातव्या मंजल्या वरील सर्व 54 अनधिकृत फ्लॅट पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाचा आदेश सोसायटीतील इमारतीवर लावण्यात आले आहे. 18 जून पूर्वी हे फ्लॅट रिकामे करून पाडा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बेलेझा बल्यू सोसायटीत फक्त चार मजले बांधण्याची परवानगी गजानन डेव्हलपर्स या बिल्डरला देण्यात आली होती. मात्र, कोणतीही परवानगी न घेता बिल्डरने अनधिकृत तीन मजले उभारले. आता या फ्लॅटधारकांची फसवणूक झाली आहे. आता पावसाळा सुरू होताना जायचं कुठे असा प्रश्न या रहिवाशांना पडलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा