अमिताभ वादाचे शेपूट लांबतेय

March 31, 2010 3:18 PM0 commentsViews: 2

31 मार्चराज्यातील कार्यक्रमांना अमिताभ बच्चन यांना बोलवावे का नाही, यावरचा वाद संपायची चिन्हे दिसत नाहीत. आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मतदारसंघात अमिताभला बोलवल गेले आहे. त्यामुळे बच्चनवरच्या बहिष्काराच्या राजकारणाचा दुसरा अंक सुरू होणार आहे. इस्लामपूरच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी मला बोलावले गेल्याचे अमिताभने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. अमिताभला आमंत्रण देणारे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळेच काँग्रेसने बहिष्कार घातलेल्या अमिताभला राष्ट्रवादी मुद्दाम बोलवते असा समज तयार झाला आहे. पण कुणाला कुठे बोलवावे हा राष्ट्रवादीचा प्रश्न असल्याचे काँग्रेस म्हणत आहे. पण गुजरातचा ब्रँन्ड ऍम्बेसिडर होण्यावरुन काँग्रेस अमिताभवर खवळली आहे. मुख्यमंत्री अमिताभसोबत साहित्य संमेलात सहभागी झाले नाहीत. त्यातून राष्ट्रवादी बोध घेईल, असे काँग्रेसला वाटत होते. पण अमिताभला दिलेले आमंत्रण जुने आहे. ते यावेत अशीच आमची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी म्हटले आहे.अमिताभच्या या प्रकरणामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या संबंधाबद्दल आता प्रश्न उभे राहिले आहेत.

close