खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ डंपरची लोकलला धडक, हार्बरलाईन ठप्प

June 16, 2016 2:46 PM0 commentsViews:

khandeshwar railway stationपनवेल – 16 जून : खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ एका डंपरने लोकलला धडक दिलीये. या अपघातामुळे ठाणे-पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीविताहानी झालेली नाही.

खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ एक डंपर बेकायदेशीरपणे रेल्वे ट्रकवरून वाहतूक करत होता. त्यावेळी डंपरचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ठाणेकडे जाणार्‍या लोकलला डंपरने धडक दिली. डंपरने धडक दिल्यामुळे लोकल जागेवरच थांबली. या अपघातामुळे ठाणे पनवेल हार्बरलाईन ठप्प झाली आहे. डंपर हटवण्याचं काम सुरू आहे. पनवेल नगर पालिकेचे बांधकाम सभापती मनोहर म्हाञे यांच्या मालकीचा डंपर असल्याचं कळतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा