हवाई सुंदरी प्रशिक्षण देणार्‍या संस्थेवर गुन्हा

March 31, 2010 3:28 PM0 commentsViews: 14

31 मार्चहवाई सुंदरी बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या पुण्यातील एका इन्स्टिट्यूटच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी मुलींना हवाई सुंदरी बनवण्यासाठी या संस्थेची शाखा पुण्यात उघडण्यात आली होती. पण त्यानंतर ही संस्था काही महिन्यातच बंद पडली.त्यानंतर विद्यार्थी आणि मनसेने याविरोधात आंदोलने केली. त्यामुळे अखेर, इन्स्टिट्यूटच्या संचालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण आरोपींना लवकर अटक न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

close